HW News Marathi
मुंबई

पिवळे मोजे घालून देशभरात अभियान, गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्डची मान्यता

मुंबई | देशभरात बालदीनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना क्राय या लहानमुलांसाठी काम करणाऱ्या सामजिक संस्थेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये #yellowfelllow हे देशव्यापी अभियान सुरु केले असून येत्या २२ नोव्हेंबरला मुंबईमध्ये या अभियानाला भव्य कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त होणार असून जागतिक विक्रमाला गवसणी घालणार आहे. याकरता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील मान्यता दिल्याचे क्रायकडून सांगण्यात आले आहे.

यावेळी या कार्यक्रमामध्ये सर्वाधिक लोक हातामध्ये सॉक पपेट घालण्याचा जागतिक विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेविअर्स कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच,कोलकातामधील डांस फॅक्टरीच्या सहकार्याने व झी बांगलाच्या पाठिंब्याने अक्रोपोलिस मॉल येथे फ्लॅश मॉब आयोजित केला जाणार आहे. या अभियानात अनेक लोकप्रिय फिल्म कलाकार देखील शामिल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अभियान चार ते पाच मुख्य शहरांमध्ये चालविले जाणार असून मुंबईशिवाय बेंगळुरूतही फ्लॅश मॉब व अन्य उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

लहान मुलांबद्दल आणि त्यांच्या आनंदी बालपणाच्या हक्काबद्दल जनजागृती करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असून या उपक्रमांमध्ये लोकांना येलो फेलोज बनून पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या अभियानात सोशल मीडियाचा खूबिने वापर करण्यात येणार आहे. याकरता पिवळे मोजे घालून yellowfellow हे हॅशटॅग वापरून स्वतःचा फोटो सोशल मीडियावर टाकुन तीन किंवा अधिक मित्र मैत्रिणींना टॅग करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे फर्मान!

News Desk

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू video

News Desk

धारावीतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून डी आर पी योजनेत समाविष्ट करा | चंद्रकांत पाटील

News Desk