मुंबई | मुंबईत हळूहळू जनजीवन रुळावर येताना दिसत आहे. अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात आता आणखी सुट मुंबईकरांचा देण्यात येणार आहे. मिशन बिगीन अंतर्गत मुंबईत आता सरसकट दुकाने सुरु कण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली आहे. तसेच, दारुच्या दुकानातही काऊंटरवर मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. याबाबतचे निर्देश पालिकेने जारी केले आहे.
मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आदेशानुसार, मिशन बिगीन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकाने सकाळी ९ ते ७ पर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. तसेच दारुची दुकानही सुरु केली जाणार आहे. त्यानुसार आता काऊंटरवर दारु मिळणार आहे. मात्र, सर्व गाईडलाईन्सचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यापूर्वी एक दिवसाआड दुकाने सुरु करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र यात आता बदल करण्यात आले आहेत.
तसेच, येत्या ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करता येणार आहे. मात्र, मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, होम डिलीव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरु ठेवता येणार आहे.
५ ऑगस्टपासून मुंबईत काय सुरु आणि काय बंद असणार?
१- सर्व अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार
२- सर्व अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानं, मार्केट यांनी परवानगी देण्यात आली आहे. सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील.
३- काऊंटरवरुन दारु विकण्यास परवानगी. याशिवाय दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी. मात्र, यासाठी सरकारने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करणं अनिवार्य. अन्यथा दुकान मालक किंवा संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होईल.
४- ५ ऑगस्टपासून सर्व मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरु ठेण्यास परवानगी. पण मॉलमधील थिएटर आणि रेस्टॉरंट यांना यातून वगळण्यात आले आहे. मॉलमधील थिएटर आणि खाद्य पदार्थांच्या स्टॉल किंवा रेस्टॉरंटला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही.
५-मात्र, रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या किचनसाठी परवानगी देण्यात आली आहे. या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटला होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
BMC eases restrictions for phased opening of lockdown under 'Mission Begin Again'.
Malls/market complexes allowed from 9 am-7 pm from Aug 5 without theatres/food courts/restaurants. Kitchen of restaurant allowed in malls where only home delivery via aggregators will be done. pic.twitter.com/Hq5IzKFmVA
— ANI (@ANI) August 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.