मुंबई | आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान भाजपाने हाती घेतले आहे या अभियाना अंतर्गत जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी मुंबईत दाखल झाले आहेत . त्यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची भेट घेतल्यानंतर उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली आहे. या दौ-यामध्ये त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
Mumbai: BJP President Amit Shah meets Ratan Tata as part of 'Sampark for Samarthan' campaign. Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis also present. pic.twitter.com/jC50HCjAxo
— ANI (@ANI) June 6, 2018
अमित शहा यांच्या आजच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियान अंतर्गत ते सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना देखील भेटणार होते परंतु लता मंगेशकर यांची तबियत ठीक नसल्यामुळे अमित शहा यांची भेट घेणे त्यांनी टाळले. परंतु लता मंगेशकर यांनी अमित शहा यांच्याशी फोनवर संभाषण केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आगामी काळात पुन्हा शहा मुंबईत येतील तेव्हा लता मंगेशकर यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.