HW News Marathi
मुंबई

आज अमित शहा घेणार उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही भेट उद्धव ठाकरे यांच्या निवसस्थान मातोश्री येथे होणार आहे. यात भेटीत शहा आणि ठाकरे यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना पालघर पराभवानंतर आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुंबईत भाजपच्या वतीने सुरु असलेले संपर्क अभियानासाठी अमित शहा आज मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्या दरम्यान शहा ठाकरे यांच्या व्यतिरिक्त उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची देखील भेट घेणार आहे.

  • अमित शहा यांचा मुंबई दौरा
  1. १२ वाजता मुंबई एयरपोर्टवर आगमन
  2. १२:३० वाजता – आशिष शेलार ह्यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट.
  3. १ वाजता – रंगशारदा येथे रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक ह्यांच्याशी चर्चा
  4. ३:३० वाजता – अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट
  5. ४:३० वाजता – गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांची पेडर रोड या निवास्थानी भेट
  6. ५:३० वाजता – उद्योगपती रतन टाटा ह्यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट
  7. ७:३० वाजता – मातोश्री येथे उद्धव ठाकरे ह्यांची भेट
  8. ९ वाजता – सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक
  9. १०:३० वाजता – वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्या सोबत चर्चा

 

Related posts

शेतकरी मोर्चावरून विरोधक आक्रमक, सरकारवर कडक टीका

News Desk

कल्याण,कुर्ला व ठाणे मुंबईतील तीन अस्वच्छ रेल्वे स्थानक

News Desk

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

News Desk