HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांना अनोखी भेट

मुंबई | नाताळचे औचित्य साधून पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून महिला प्रवाशांसाठी दोन नव्या ‘लेडिज स्पेशल’ गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावर ‘लेडिज स्पेशल’ गाड्यांची संख्या १० वर पोहचली आहे. या दोन्ही नवीन गाड्या धिम्या मार्गावरून धावणार आहेत.

येत्या २५ डिसेंबरपासून या गाड्या नियमित धावतील असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे . या नव्या लोकलमुळे सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांची विरार स्थानकावरून सुटणारी लेडिज स्पेशल लोकल १२ मिनिटे उशिराने धावेल. ती सकाळी ८ वाजूून ५६ मिनिटांनी सुटणार आहे.

नवीन सुरु होणा-या गाड्यांपैकी पहिली लोकल सकाळी ९.०६ वाजता भाईंदर स्थानकातून सुटेल, तर सकाळी १०.३० वाजता चर्चगेट स्थानकात पोहोचेल. दुसरी गाडी सकाळी १०.०४ वाजता वसई रोड स्थानकावरून सुटेल, तर सकाळी ११.३० वाजता चर्चगेटला पोहोचेल.

खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळी १० वाजून २० मिनिटांची चर्चगेट-वांद्रे गाडी, तसेच सकाळी १० वाजून ५९ मिनिटांची वांद्रे-चर्चगेट गाडी रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावधान मुंबईकरांनो, चायनीज गाड्यांवर निकृष्ट दर्जाचे चिकन

News Desk

अभिनेता सुशांतसिंह सोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने केली आत्महत्या

News Desk

गोवर संसर्ग : मुलांचे लसीकरण करुन घेण्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

Aprna