HW News Marathi
मुंबई

उल्हानगरमध्ये भोंदू बाबांना संतप्त नागरिकांनी झोडपले; चारही भोंदू पोलिसांच्या ताब्यात

कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात कामात व्यस्त असलेल्या नागरिकांना लक्ष करत त्यांना भुरळ घालत बेशुद्ध करून लुटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. असाच एक प्रकार सोमवारी १२.३०वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील वर्दळीच्या आरटीओ कार्यलयाच्या परिसरात घडला. एका आरटीओ एजंटला भुरळ घालत त्याला लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार भोंदू बाबांना संतप्त नागरिकांनी यथेच्छ झोडपून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोकनाथ राजेस्थानी, धनानाथ कालबेलीया, किसननाथ कानुनाथ आणि विजयनाथ कालबेलीया अशी जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे गजाआड झालेल्या भोंदू बाबांची नावे आहेत. बेदम मारहाण झाल्याने खडकपाडा पोलिसांनी या चौघाही भोंदूंना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई तपसानंतर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कल्याण पश्चिमेकडील आरटीओ परिसरात राहणारा रोहन बाबडे हा आरटीओ एजंट म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी अकरा ते साडे बारा वाजण्याच्या सुमारास रोहन हा आरटीओ कार्यालयात आपले काम करत बसला होता. इतक्यात अचानक भगवी वस्त्रे व सर्वांगाला अंगारा फासलेले ४ साधू त्याच्याकडे आले. या साधूंनी बोलता बोलता रोहनला भुरळ घातली. त्यामुळे रोहन बेशुद्ध पडला. तोल गेल्याने बसल्या जागी तो कोसळला. या बाबांनी त्याच्याकडील सामान हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज झाल्याने आसपासच्या नागरिकांना संशय आला. त्यांनी रोहनकडे धाव घेतली. रोहनच्या बाबतीत घडलेला प्रकार लक्षात आला. हे बाबा पळून जाण्याच्या बेतात असताना नागरिकांना त्यांना पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर या लुटारू बाबांना खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात. मारहाणीत जखमी झालेल्या चारही भोंदू बाबांना उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही?

swarit

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग

News Desk

विलेपार्ले ते गोरेगावपर्यंत २० टक्के पाणी कपात

swarit