HW News Marathi
मुंबई

सोनिया गांधींच्या विरोधात केलेल्या विधनाबाबत मुंबईत उद्या अर्नब गोस्वामींची पुन्हा चौकशी होणार

मुंबई | काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्यामुळे खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी मुंबई पोलिसांनी गोस्वामींची १२ तास चौकशी देखील केली होती. आता पुन्हा चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे.

पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली.

दरम्यान, नागपूर पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गोस्वामी यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून पोलिसांकडून रविवारी दोन नोटिस पाठविण्यात आल्या होत्या.

काल (८ जून) आणखी एक नोटीस काढण्यात आली असून उद्या ( १०जून) मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या नोटीस नुसार उद्या सकाळी ११ वाजता गोस्वामी यांना पायधुनी पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुरेश गायकवाड यांच्यासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपल्या महापौरपदाचा राजीनामा द्या !

News Desk

लोकलने सिग्नल तोडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit

कासकरच्या हस्तकांनी खंडणीतील सोने उधळले बारबालांवर

News Desk