मुंबई | मध्य रेल्वेने अखेर रविवारचे वेळापत्रक रद्द केले आहे. प्रवाशांचे होणार हाल पाहून मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याचे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्य रेल्वेला जवळपास ६ तासानंतर रविवारचे वेळापत्रक रद्द केले आहे. यानंतर मध्य रेल्वेने बुधवारी (३ जुलै) रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून महिला, विद्यार्थी एकातासापेक्षा अधिक वेळ झाला असला तरी स्थानकात अडकून पडले होते.
As announced by CR, and looking at the forecast, suburban services now running as normal weekday schedule.
CR appreciate the support extended by commuters.— Central Railway (@Central_Railway) July 3, 2019
या रेल्वे स्थानकांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रवाशाने ठाणे आणि डोंबिवली मुंबईसाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग ते विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यान अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर येत आहे. या दगडफेकीत दोन तरुणी जखमी झाल्या असून त्यांना राजावाडीत रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तरी देखील लोकलच्या गर्दीमुळे ट्रेनमधून उतरताना दोन महिलांना चक्कर आली असून रेल्वे स्थाकातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस प्लॅटफ्रॉमवर दाखल झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.