HW News Marathi
मुंबई

सहायक पोलीस आयुक्तसोबत रिक्षा चालकांची मुजोरी

मुंबई | रिक्षा चालकांच्या मुजोरीने प्रवासांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. रिक्षाचालकच्या याच मुजोरीची प्रचिती हिंगोलीच्या सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना आली. रिक्षा चालक आणि पोलीस हे प्रवासी यांच्याशी कसे वागतात अनुभव त्यांना आला. सुजाता पाटील यांनी रिक्षाचालका विरोधात त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून आणि रिक्षा चालक यांच्याकडून आलेला अनुभव सुजात पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट लिहून मांडला.

  • सुजाता पाटील यांची फेसबुक पोस्ट

आज २४ मार्च मी भोपाळवरुन पाच दिवसाची ट्रेनिंग आटोपून पंजाब मेलने मुंबई गाठले. पंजाब मेल ३ तास लेट होती. मी खुप थकले होते असून पाय फ्रॅक्चर मुलगी आजारी जीव कासावीस झाला होता. लंगडत लंगडत बॅग ओढत सकाळी १० वाजात अंधेरी स्टेशला पोहचले होते. अंधेरी स्टेशन पश्चिम नेहमीच रिक्षावाले प्रवाशाना छळवणुक करतात. नेहमीप्रमाणे रिक्षावाले भाडे नकार. कोणाला काही देणेघेणे नाही. समोर पोलीस शिपाई १०० फूट खुर्चीत बसुन, हा सगळा उतमात पोलिसासमोर सुरू होता. मी माझी ओळख सांगायची नाही ठरवलेच होते. पोलीस चौकीत पोलीस मदत मागता पोलीस शिपाई धनवडे व शिर्के डि. एन. नगर पोलीस आरामात बसुन ईशारा केला पण पोलीस सांगतो येणार नाही. बॅगा ओढत पोलीस जावुन रिक्षावाले भाडे नाकारत आहेत. सांगता, ऑन ड्युटीवरील पोलीस शिपाई १० मिनिटे हा उतमात बोलून भरभरुन अपमान केला. मला क्षणभर काहीच कळेना. एका महिला प्रवासीचा अपमान कशाप्रकारे केला जावू शकतो आज अनुभव घेतला. डोळे पानावले. अजूनही समजत नाही. महिला कधी सुरुक्षित होतील….हा होता माझा आजचाएका प्रवासी महिलेचा कटु अनुभव..जय हिंद.”

सुजाता पाटील यांची फेसबुकवरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र पोलीस आणि रिक्षा चालक यांच्या मुजोरी पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. या विषयावर फक्त चर्चाच होणार की, रिक्षाचालकाच्या मुजोरीवर काही तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्फिन्स्टन पुलाचे उद्घाटन, मुख्यमंत्र्यांचा रेल्वेतून प्रवास

News Desk

मालाडच्या सोमवार बाजारमध्ये आग

News Desk

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात आग

News Desk