HW News Marathi
मुंबई

नालासोपाऱ्यातील स्फोटके प्रकरणी घाटकोपरमध्ये एटीएसकडून एकाला अटक

मुंबई | नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसने घाटकोपरमधून अविनाश पवार या ३० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यातील सनातन संस्थानच्या साधकास वैभव राऊत यांच्या घरी (९ ऑगस्ट) एटीएसला स्फोटके सापडली होती. या प्रकरणी एटीएसने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर या पाच जणांना अटक केली आहे.

वैभव राऊत यांच्या घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. राज्यात सणा-उत्सवात घातपात घडवून आणण्याचा मोठा कट होता. परंतु एटीएसने हा कट उधळून लावला. अविनाश पवार हा कट्टर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता असून तो सनातन संस्था आणि इतर हिंदुत्त्ववादी संघटनांना मानतो. अविनाश हा सरकारी नोकरीत कामाला करत असून दोन वर्षापुर्वी या संघटनांच्या माध्यमातून तो या पाच जणांच्या संपर्कात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्नशील राहण्याची गरज! – दीपक केसरकर

Aprna

घाटकोपर विमान दुर्घटना आणि ते दोघे

News Desk

मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

swarit
संपादकीय

आरएसएस भाजपच्या विचारधारेपासून अलिप्त रहात आहे का ?

swarit

पूनम कुलकर्णी | देशात सध्या सर्वत्र जातपात आणि धर्माचे राजकारण होताना पहायला मिळत आहे. परंतु सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हल्लीच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात धर्म म्हणजे नक्की काय याची व्याख्या उपस्थितांना समजावली. अलिकडे धर्म म्हटले की जातीचे राजकारण सुरु होते. परंतु पुत्र पित्यासाठी काय करतो तेव्हा तो पुत्रधर्म असतो. पिता पुत्रासाठी काय करतो तेव्हा तो पितृधर्म असतो. राजा राज्यासाठी काम करतो तेव्हा तो राजधर्म असतो. जीवनात सुखी रहाण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या आपल्याला मिळत असतात. परंतु त्यात व्यत्यय येतो तेव्हा समाज विचलित होतो. परंतु खऱ्या अर्थाने धर्माची व्याख्या नक्की काय हे समजून घेण्याची सर्वांना गरज असल्याचे यावेळी भागवत म्हणाले.

सध्या भाजपचे अनेक नेते धर्माचे राजकारण करताना पहायला मिळातात सरसंघचालकांचे धर्माबाबतचे असे विचार म्हणजे भाजपमधील जातीवादी नेत्यांच्या थोबाडात बसलेली चपराक म्हणावी लागले. धर्म किंवा समाज सुधारणेची आणि सेवेची सुरुवात आपल्यापासून करायला हवी असे म्हणताना त्यांनी नाना पालकरांच्या सामाजिक कार्याचे अनेक दाखले दिले.

संघ म्हणजे हिंदुत्व असे वाटणा-या अनेकांना भागवतांनी दिलेला संदेश भाजप आणि संघाची विचारधारा अत्यंत विभिन्न असल्याचे दाखवून देतो. संघाचे काम हे सर्वांना संघटीत करण्याचे काम आहे. केवळ हिंदूंना एकत्र आणण्यासाठी संघ असल्याचे अनेकांना नेहमी वाटते. परंतु, भागवतांनी समाजाला एकत्र आणण्याचे काम संघ करत असल्याचे म्हटले.

भागवतांच्या या वक्तव्यामुळे कुठेतरी सध्या संघ आणि भाजपची विचारधारा विभिन्न होत असल्याचे दिसून येते. भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतो किंवा अनेक इतर नेते कुठेतरी धर्माला कवटाळून बसलेले पहायला मिळतात. परंतु तर दुसरीकडे समाजाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा धर्म जपण्याचा संदेश सरसंघचालक सर्वांना देतात. त्यामुळे सध्या भाजप आणि संघाच्या विचारधारेत विभिन्नता येत असल्याचे पहायला मिळत आहे.

 

 

 

 

Related posts

महिलांची सुरक्षा नक्की आहे तरी काय ?

swarit

आशियाचा नोबेल ‘मॅगसेसे पुरस्कार’

swarit

मी मराठी

swarit