HW News Marathi
मुंबई

गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व खड्डे भरणार,आयुक्तांचे गणेशोत्सव मंडळांना आश्वासन

मुंबई | गणेशोत्सवापूर्वी मुंबईमधील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर असलेल्या खडड्ड्यांबाबत तक्रार केली असता मंडळांनी खड्डे दाखविल्यास संबंधित विभागातील अधिकारी ते खड्डे त्वरीत बुजवतील, असे आश्वासन मुंबई महानगरपालिकेचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गणेश मंडळांना दिले आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, पालिका आणि पोलीस अधिकारी यांची बैठक महापालिका मुख्यालयात नुकतीच पार पडली. या वेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी खड्ड्यांबाबत चिंता व्यक्त केली. त्या वेळी संबंधित गणेश मंडळांनी संबंधित विभागाचे उप आयुक्त आणि सहायक आयुक्तांकडे आपली तक्रार नोंदविल्यानंतर तत्काळ खड्डे बुजविले जातील. असे आश्वासन मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हांला संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित – राज ठाकरे

News Desk

धक्कादायक ! राज्याचा आकडा ६३५ वर पोहोचला

News Desk

ग्राहकांना मोबाईलवरील एसएमएसद्वारे पत्त्याची दुरुस्ती करता येणार

News Desk