HW News Marathi
मुंबई

भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या विसर्जन रथावर वादग्रस्त फलक

पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळने गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या रथावर एक वादग्रस्तफलक लावण्यात आला आहे. त्यानुसार भाऊसाहेब रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक, तर लोकमान्य टिळक यांना प्रसारक म्हटले आहे. हा फलक पुण्यात आज चर्चेचा विषय ठरणार आहे. गणेशोत्सवापूर्वी यावरून झालेल्या वादाला नव्याने तोंड फुटणार आहे.

यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हावरून टिळकांचे चित्र काढून टाकण्यात आले होते.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असून पालिका आणि सरकारकडून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला होता. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पुण्यातील गणेशोत्सवाला १८८२ पासून सुरुवात केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजानिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. मात्र, आजवर झालेल्या उत्सवात त्यांच्या नावाचा उल्लेखही केला जात नाही. सुरुवातीच्या काळात तीन गणपती बसवले जात होते. त्यानंतर मानाच्या गणपतीचा उत्सव साजरा केला गेला. याच्या सर्व नोंदी इतिहासात पाहायला मिळतात. मात्र,सरकारकडून खऱ्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पुढील काळात महापालिकेने याची दखल घ्यावी. त्यांच्या नावाने हा उत्सव साजरा केला पाहिजे. तसेच यंदाचे वर्ष हे गणेशोत्वाचे १२६ वे वर्ष असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर याकडे दुर्लक्ष केले जात असून याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाने दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी दिल्ली सारखीच

Aprna

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा पाठिंबा

Gauri Tilekar

भाजप ही सिंहाची पार्टी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk