HW News Marathi
मुंबई

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

मुंबई | भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मुंबईसह महाराष्ट्रात सभा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी ३०० ते ४०० कार्यकर्त्याना ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना दिंडोशी, वनराई, घाटकोपर, समता नगर, शिवाजी पार्क, दादर, वरळी या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या हॉटेलमध्ये नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. आज भीम आर्मीची वरळी जांबोरी मैदानात सभा होती. मुंबईसह महाराष्ट्रात सभा घेऊ नये म्हणून पोलीस आम्हाला ताब्यात घेत आहेत अशी माहिती भीम आर्मी कडून देण्यात आली आहे.

मनाली हाॅटेल स्टेशन परिसर व आसपासच्या परिसरात पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त मनाली हाॅटेल जवळून भीम आर्मी मुंबई प्रमूख सुनील गायकवाड मराठवाडा विभाग प्रमुख बलराजजी दाभाडे,पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अॅड सचिन पट्टेबहादूर अॅड अखिल शाक्य सोलापूर प्रवीण बनसोडे बुलढाणा यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाली हाॅटेल येथून पोलीसांनी केली अटक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दलाल, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, काही भागात साचले पाणी

News Desk

यंदा कितीही थर लावा; न्यायालयाने निर्बंध हटविले

News Desk
देश / विदेश

जम्मूमध्ये बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk

जम्मू | जम्मू बस स्टँडमध्ये काल मध्यरात्री एक ग्रेनेड स्फोट झाला आसून या स्फोटामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या स्फोटामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हाणी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या वेळी फेकण्यात आलेल्या ग्रेनेडची तीव्रता कमी असल्यामुळे जीवित हाणी झालेली नाही.

प्राथमिक तपासणीमध्ये असे आढळून आले आहे की हॉटेल सम्राट जवळ अज्ञात व्यक्तीने रात्री १२ :२० च्या दरम्यान हे ग्रेनेड फेकले होते. दरम्यान यामुळे जीवित हाणी झालेली नाही. या संदर्भात पोलिसांनी एफआयआर नं. 72/2018 / एस 3/4 ईएसए, 307, 120 बी आरपीसी अंतर्गत एक केस दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related posts

विकासासाठी राज्य-केंद्र अशा दोन्हीकडे एकाच विचारांचं सरकार असावं! – पंतप्रधान मोदी

News Desk

चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडणार

News Desk

मोदींना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी

swarit