मुंबई | छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने सोमवारी त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीएमएलए कोर्टात सुनावणीकरीता जात असलेल्या भुजबळांच्या अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच यावेळी भुजबळ यांना श्वसनाचाही त्रास होऊ लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
#Mumbai : Former Deputy CM of Maharashtra Chhagan Bhujbal has been admitted to Jaslok Hospital over his health condition. More details awaited. pic.twitter.com/6EonI9f1gN
— ANI (@ANI) August 6, 2018
सध्या छगन भुजबळ यांच्यावर डॉक्टर मेहता उपचार करत आहेत. आवश्यक वाटल्यास पुढील उपचारांसाठी भुजबळ यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे. तसेच बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार 6 सप्टेंबरपर्यंत छगन भुजबळ यांच्यासहीत 35 आरोपींना वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.