HW Marathi
मुंबई राजकारण

भाजपची मुंबईमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निदर्शने

मुंबई । पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी (१४ मे) भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान गोंधळ झाला होता. या घटनेच्या  निषेध करण्यासाठी आज (१५ मे) मुंबई भाजप कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप प्रवक्ते अतुल शहा, इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.

संपूर्ण देशातून ममता बॅनर्जींकडून केलेल्या कृत्याचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अमित शहांच्या रोड शोदरम्यान असा गोंधळ निर्माण करणे हा तृणमूल कॉंग्रेसचा पुर्वनियोजित कट होता असा आरोप भाजप प्रवक्ते अतुल शहा यांनी केला आहे. ममताचे हे कृत्य लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि याचे उत्तर देशातील जनता त्यांना २३ तारखेला देईल असेही शहा म्हणाले.

भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या गोंधळानंतर  कोलकातामधील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले होते. यानंतर तृणमूलच्या ममता बॅनर्जी आणि अमित शहा यांनी ऐकमकांवर आरोपही केले. अमित शहानी आज (१५ मे)  सकाळी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या घटनेचा निषेध करत तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर टीकास्त्र सोडले आहे. आतापर्यंत ६ टप्प्यांमध्ये मतदान पार पडले असून यापैकी एकाही टप्प्यातील मतदानाच्या वेळी देशभरात बंगाल वगळता कुठेही हिंसाचार झाला नाही. याचा अर्थ तृणमूल कॉंग्रेसचाच यामागे हात असल्याचा आरोप अमित शहांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.

Related posts

#LokSabhaElections2019 : मला राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही !

News Desk

शिवसेनेने उत्तर प्रदेशासाठी जाहीर केली ५ उमेदवारांची यादी

News Desk

समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk