कोहिमा | आपण सर्वांनीच पैशाचा पाऊस पडतो, हे चित्र एक तर सिनेमात पाहिले असेल किंवा गोष्टीत ऐकले असेल. खऱ्या आयुष्यात असे काही घडणे अशक्य वाटते. पण, हे सत्य नागालँडमध्ये ‘पैशाचा पाऊस पडला’ आहे. नुकतेच नागालँडचे विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून यात भाजप आणि एनडीपीपीला १९ जागा निवडून आल्या आहेत. भाजपच्या नवनिर्वाचित आमदार एच. खेहोवी यांनी त्यांच्या बाल्कनीतून नोटा फेकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#BattleForNagaland — In Suruhuto constituency, BJP candidate H Khehovi can be seen throwing money from the balcony after winning. The candidate is a first-time politician. The 52-year-old is a Crorepati and is a Retd Govt employee, turned entrepreneur turned politician. pic.twitter.com/yP9z9k5V0q
— News18 (@CNNnews18) March 5, 2018
हा व्हिडिओ CNN news18 या चॉनेलने प्रसारीत केला आहे. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप विरोधात टीका होता आहे. एच. खेहोवी हे सुरुहोटो या विधानसभा क्षेत्रातून निवडूण आले आहेत. पुर्वी ते सरकारी कर्मचाही होते. निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यांनी राजकारणात प्रवेश केला असून ते आमदार म्हणून निवडणून देखील आले.
नागालँडमध्ये भाजपने नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) यांच्याशी युती करुन विधानसभा निवडणूक लढवली होती. या युतीने निवडणुकीत २९ जागा जिंकल्या आहेत. नागालँड पीपल्स फ्रंट (एनपीएफ)ला २७ आणि अन्य ३ जागावर विजय मिळाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.