HW News Marathi
Covid-19

कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकाचा कॉन्टॅएक्ट ट्रेसिंगवर भर

मुंबई | राज्यात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता कोणत्या पद्धती अवलंबल्याने आकडा कमी होईल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेने बाधितांचा आकडा रोखण्यासाठी आता कॉन्टॅएक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. पालिकेने रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कंटेन्मेंट झोनमधील उपाययोजनांसाठी पालिकेतील अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. तसेच पालिका सध्या तीन पातळ्यांवर काम करते आहे. एक म्हणजे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून चाचण्या सुरू आहेत. त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना पालिका शाळांमध्ये व्यवस्था केलेल्या ठिकाणी उपचार सुरू केले आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे जे रूग्ण पॉझिटिव्ह आहेत पण ज्यांच्यामध्ये सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे नाहीत, अशा रूग्णांसाठी मोठमोठ्या शाळा आणि बीकेसीसारख्या ठिकाणी व्यवस्था केली जात आहे आणि ज्या रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी रूग्णालयात खाटांची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या करोना टास्क फोर्सच्या अधिकारी मनिषा म्हैसकर यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

होरायझन प्राईम हॉस्पिटलची कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द, अवाजवी बील आकरल्याने पालिकेचा दणका !

News Desk

ठाकरे सरकारने माफी मागून दंडाचे पैसे लोकांना परत करावेत !

News Desk

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद

News Desk