HW News Marathi
Covid-19

मुंबईत पालिकेने रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी ‘या‘ टिप्स अवलंबल्या

मुंबई । राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण खूप वाढले होते. मुंबईत कोरोनाचे हॉट स्पॉट ठरलेल्या धारावीत देखील बाधितांचा आकडा आरोग्य प्रशासन, सरकार, पोलीस या सगळ्यांनी मिळून आटोक्यात आला. तसाच, हा आकडा संपूर्ण मुंबईत देखील कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे अथक परिश्रम हेच बधितांचा आकडा कमी होण्यास कारणीभूत आहे. आणि त्याचे कौतुक सर्व स्तरांतून होत आहे.

पालिकेने काही टिप्स अवलंबल्या होत्या.

काय आहेत पालिकेच्या टिप्स?

१. मुंबईत कोरोना विषाणूचा विळखा वाढू शकतो हे कळताच सुरुवातीला मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले.

२. मुंबईत झोपडपट्टया अधिक असल्याने कोरोना वेगाने पसरू शकतो म्हणून पालिकेने प्रभावी उपाययोजना केल्या.

३. कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

४. मुंबई महापालिकेने सुरुवातीला एक प्रोग्राम हाती घेतला.

* कोरोनाच्या चाचण्या करणे

* रुग्णांचा शोध घेणे

* रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करणे

* कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न

* सोशल डिस्टन्सिंग पाळणे

या महत्त्वाच्या सूत्रांचा वापर करुन एक मॉडेल तयार करण्यात आले. ज्यामुळे कोरोनाची संख्या दाट लोकवस्ती असूनही कमी करण्यास मदत झाली. धारावीच्या या पॅटर्नचं WHO ने देखील कौतुक केले होते.

५. स्थानिक नागरिक,महानगरपालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले.

६. कोरोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करून रुग्णांवर योग्य उपचार करणे, शारीरिक अंतराच्या नियमांचे, स्वच्छतेचे आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते.

७. कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंन्टेंमेट झोन आणि इमारती सील केल्या. या भागातील लोकांना घरपोच अत्यावश्यक सेवा पुरवल्या. यामुळे कोरोना साखळी तोडण्यास मदत झाली.

८. मुंबई महापालिका रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्यात आली. तसेच बेडची माहिती त्वरित मिळावी म्हणून रुग्णालयात डॅश बोर्ड तयार करण्यात आला.

९. मुंबईत कोरोना रोखण्यास मदत झाली. अनेक भागात घेतलेले फिवर क्लिनिक, फिरते मोबाईल व्हॅन, दवाखाने या सगळ्याची सोय केल्याने मदत झाली.

१०. खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड मुंबई पालिकेने ताब्यात घेतले. ते कोरोना रुग्णांना कमी किमतीत देण्यात आले.

११. मुंबईत रुग्ण वाहिकांची संख्या वाढवण्यात आली. मग त्याची सुद्धा माहिती नागरिकांना लवकर मिळावी त्यासाठी हेल्पलाईन नंबर तयार करण्यात आला.

१२. मुंबईत कोरोना रुग्णांना लवकर बेडस उपलब्ध व्हावेत, यासाठी २४ वॉर्डमध्ये हेल्पलाईन सेंटर तयार करण्यात आले.

१३. सरकारी डॉक्टर आणि खासगी डॉक्टर यांची मदत घेण्यात आली.

१४. मुंबई सेरो सर्व्हे ,अँटीजन टेस्ट,एक्सरे व्हॅन सुरु करण्यात आल्या.

१५. मुंबईत कोरोना रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर यांची टीम दिवसरात्र काम करत होती.

मुंबई महानगरपालिकेने या सर्व बाबी काटेकोरपणे पाळल्याने मुंबईत रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यास पालिकेला तसेच सरकारला देखील यश आले. पुण्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी पुण्यात देखील हा पॅटर्न अवलंबवत संख्या आटोक्यात आणण्यास प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाला गांभीर्याने घेऊ नका असा सल्ला देणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचे निधन

News Desk

महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार नाही, तर महाविकास आघाडी सरकार !

News Desk

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस!

News Desk