मुंबई | दक्षिण मुंबईतील धोबीतलावं येथे डॉ.होरामजी कावसाजी स्ट्रीट रोड वर कचऱ्याची गाडी(clean up) लागते पण तिथे फक्त वरच्यावर कचरा साफ करतात .आणि तिथे जमा झालेले पाणी काढत नाही व पाण्यामधील घाण काढत नाही असे रोज घडते .फक्त तेथील स्थानिकांना खुप नाहक त्रास सहन करावा लागतो येथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रार बीएमसी सी वॉर्ड मध्ये दाखल केली आहे.पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही .दुर्लक्ष होत आहे. दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते किशोर राठोड यांनी ही ऑनलाईन तक्रार सी वॉर्ड मध्ये केली होती.
अक्षरशः स्थानिक लोकांना खूप या घाणीची कीव आली होती .आजारी पडण्याची शक्यता आहे.या घाणीमुळे मच्छर ही खुप प्रमाणात झाले आहेत.लहान मुलांना सकाळी शाळेत जाताना रस्ता क्रॉस करतानाही भीती निर्माण झाली आहे. पहिल्यांदा फक्त एक कचऱ्याची गाडी लागायची आता तर छोट्या छोट्या 4-5 गाड्या लागतात आणि काही खड्ड्यामध्ये सांडपाणी व कचरा तसाच राहतो व सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटाराचीही व्यवस्था नाही आहे त्यामुळे दुर्गंधी पसरत असते .व त्या गाडीतून घाण पाणी पडत असते आणि ते खड्ड्यामध्ये साचले जाते तेथील स्थानीक नागरिक व व्यापा-यांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो.
तीन दिवस गाडी लावून न दिल्यामुळे बीएमसी ‘सी’ वॉर्डचे सर्व वॉर्ड ऑफिसर यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती .आज तिसऱ्या दिवशी शेवटी या बैठकीत अंतिम निर्णय सफल झाला.व त्या ठिकाणीं जागेवर खड्डे पडले होते ते सर्व खड्डे बुजावण्यात येतील असे आश्वासन दिले स्थानिक नागरिकांनी व व्यपाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले . प्रत्येक गल्लोगल्ली मध्ये कचऱ्याची घंटागाडी फिरेल आपण सर्व मिळून आपण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सगळ्याना जागृत करून गाडी मध्ये कचरा टाकायला सांगू.तुम्हा सर्वांची साथ असेल आपण नक्की यशस्वी होऊ अशी प्रतिक्रिया बीएमसी सी वॉर्ड चे सहाय्यक अभियंता (घ.क.व्य) शंकर मुढे यांनी दिली.
मी एक सरकारी नोकर आहे पन मला सामासेवेची आवड आहे .म्हणून मी जनतेची सेवा करत असतो .अशी अनेक सामाजिक कामे करत असतो गल्लोगल्ली कचऱ्याची घंटागाडी फिरणारा या पर्यायी गाडीने या कामाबद्दल माझे स्थानिक नागरीकांनी व व्यपाऱ्यांनी कौतुक केले अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते किशोर राठोड यांनी दिली . या बैठकीमध्ये माजी नगरसेवक जनक संघवी, समाजसेवक किशोर राठोड, स्टीव्हन फर्नांडीस,गिरीश दुबे,पीटर लॉड्रीग्स,राहुल साळुंखे आदी यांची उपस्थिती होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.