HW News Marathi
मुंबई

बोरीवलीत बॉम्ब नसून लहान मुलांचे खेळणे

मुंबई | बोरीवली पश्चिम येथे गीराई डम्पिंग ग्राऊंडमध्ये आज (२५ फेब्रुवारी) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कचऱ्यात बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु बीडीडीएस पथकाने तपासणी केल्यानंतर कळाले की, हे बॉम्बच्या आकाराचे लहान मुलांचे खेळणे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे भयभीत बोरिवलीकरांना सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गोराईतील कृष्णा मेनन अकादमी ज्युनियर कॉलेजची बस गोराईवरून मुलांना घेण्यासाठी निघाली होती. त्यावेळी बसमधील महिला तृप्ती गोरक्ष यांच्या नजरेस काहीतरी संशयास्पद वस्तू आढळून आली. यानंतर शाळा व्यवस्थापकांना फोन करून त्यांनी याबाबतची माहिती दिली. शाळेने पोलीस नियंत्रण कक्षास ही माहिती मिळताच घटनास्थळी बीडीडीएस पथक दाखल झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंडे आणि परिचारक यांचा विधानसभेतील उल्लेख वगळा जाणार

News Desk

महिलेवर बलात्कार करून हत्या ?

News Desk

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या टेंशनने ह्रदयविकारचा झटका

News Desk