HW News Marathi
मुंबई

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात इमारतीला स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही

मुंबई | मुंबईच्या फोर्ट परिसरातील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची आज (२५ जून) दुर्घटना घडली आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. यात आतापर्यंत ४० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही.

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील पाच मजली इमारतीचा आतील स्लॅब कोसळला आहे. यात काही जण अडकल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. सदर इमारत म्हाडाची असल्याचं सांगण्यात येत आहे. याठिकाणी इमारतीचं दुरूस्तीचं काम सुरू होतं आणि काही मजूर देखील इथंच राहत होते. इमारतीची आतील बाजूनं डागडुजी सुरू होती. त्याच ठिकाणी पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर कमी असला तरीही धोकादायक इमारतींचा प्रश्न प्रामुख्याने समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मालाड येथील इमारत दुर्घटनेत काही जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. ज्यानंतर मुंबई महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींना नोटीस पाठवली होती. सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगंली हत्ती गैरव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कर्नाटकात प्रशिक्षण

News Desk

आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक

News Desk

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल

News Desk