HW News Marathi
मुंबई

बेस्ट चालकाला बस चालवताना आला हृदयविकाराचा झटका

मुंबई | मुंबईत आज (२० ऑक्टोबर) बेस्ट बस चालकाला बस चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. मात्र, बस चालकाने प्रसंगावधान दाखवत वेग कमी करुन बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानात घुसली आणि सिग्नलला धडकून थांबली. सुदैवाने या घटनेत बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. तर बस चालकावर प्रकृतीही स्थिर आहेत.घाटकोपरवरुन टाटा पॉवर हाऊस, चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या ३८१ क्रमांकाच्या बसला आज सकाळी अपघात झाला आहे. चेंबूर पोलीस स्टेशनसमोर बसंत पार्क इथे हा अपघात झाला आहे.

बसमध्ये १० ते १२ प्रवासी प्रवास करत होते. बसवरील ताबा सुटल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या फुटपाथवर बस आदळली आणि त्यानंतर जवळच असलेल्या भाजीच्या दुकानात घुसली. बसचा वेग जास्त असल्यामुळे पुढे जाऊ ती थेट सिग्नलवर जाऊन आदळली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. बस आदळल्यानंतर प्रवाशांनी तात्काळ बसमधून बाहेर उड्या टाकल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारचे सर्वच आलबेल, सामना,तून टीका

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्षात्रतेज आणि राष्ट्रासाठी प्रेरणा पुरुष !

News Desk

राज्य महिला आयोगाकडून ‘सुहिता’ महिलांसाठी हेल्पलाइन

swarit