HW News Marathi
मुंबई

भायखळा राष्ट्रवादीकडून धाडसी सुनीता पाटील यांचा सत्कार

मुंबई | परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या धाडसी अधिकारी सुनीता पाटील (सहाय्यक केंद्र अधिकारी,अग्निशमन) यांचा भायखळा राष्ट्रवादी तर्फे सत्कार करण्यात आला. सुनीता शिंदे-महाराष्ट्र सचिव राष्ट्रवादी महिला मुंबई अध्यक्ष सुरेखा पेडणेकर व राष्ट्रवादीच्या भायखळा महिला तालुका अध्यक्षा चंदना साळुंके यांच्या हस्ते सुनीता पाटील यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत सुनीता पाटील यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वतः इमारतीत शिरत १७ जणांचे प्राण वाचवले आहेत. विशेषबाब म्हणजे यामध्ये तीन गरोदर महिलांचाही समावेश आहे. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी भायखळा पश्चिम येथील ‘मुंबई अग्निशमन दल मुख्यालय व भायखळा प्रादेशिक समादेश केंद्र’ येथे भायखळा राष्ट्रवादी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी सुनंदा देठे, नंदा जाधव,सरला खळदकर,सुप्रिया जाधव आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माज़ी नगरसेवक संतोष उरणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती उरणकर समर्थकांसह भाजपमध्ये

News Desk

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ घोषणा

News Desk

भाजपाविरोधात विरोधकांची मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’, दिग्गज नेत्यांचा सहभाग

swarit
राजकारण

गरीबांना अजून गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती | अजित पवार

News Desk

गरीबांना अजून गरीब करणे आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती आहे. त्यामुळे अशा पक्षांना बाजुला करण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मंठा येथे बोलताना केले. हल्लाबोल आंदोलनातील जाहीर सभेत ते बोलत होते.

राज्यात ९ हजार गावे ५० पैशापेक्षा कमी आणेवारीवाली आहेत. त्यातील पाच हजार गावे मराठवाड्यातील आहेत. पण भाजपचे सरकार आल्यापासून त्यांच्या मंत्र्यांना शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात काहीच बदल करता आलेला नाही. भाजपच्या मंत्र्यांनी केवळ जॅकेटची फॅशन आणली, असा खोचक टोमणा त्यांनी त्यांनी सरकारला मारला.

शिवसेना किंवा त्यांच्या प्रमुखांना शेतीतले काय कळते? फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन यांनी सत्ता मिळवली. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काहीही काम केलेले नाही. या नाकर्त्या लोकांना बाजुला करण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन आहे, असे ते म्हणाले.

जालना जिल्ह्यात स्व. अंकुशराव टोपे यांनी सहकारी संस्था उत्तमरित्या चालविण्याचा आदर्श घालून दिला. राजेश टोपे त्यांच्याप्रमाणेच संस्थेचे काम पाहत आहेच. पण जालन्यातील इतर नेत्यांनी मात्र संस्था विकून खाल्ल्या, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की मंठा-परतूर मतदारसंघात होत असलेली सभा ही अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. खाली-वर, इकडे-तिकडे कुठेही नजर मारली तर माणसंच माणसं दिसत आहे. घराच्या छपरावर बसूनही लोक सभेला उपस्थित आहेत. त्यामुळे ‘हवा का रुख बदल गया है’ हेच या सभेचे समर्पक वर्णन करता येईल.

भाजपच्या काळात अनेक मोठ मोठे उद्योग बंद होत आहेत. लोकांचे रोजगार जात आहेत. करोडो रुपये जाहीरातीवर खर्च करुन लोकांना फसवण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे भाजपचे ‘भारतीय जाहीरात पार्टी’ असे आता भाजपचे नामकरण करायला हवे, अशी टीका आमदार राजेश टोपे यांनी केली.

खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. पण अद्याप पिक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. जर लवकर पैसे नाही मिळाले, तर आम्ही हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला.

मंठा येथील हल्लाबोल सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री आ राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, आ. अॅड. जयदेव गायकवाड, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ नरेंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, विजय बोराडे, विलासराव लांडे उपस्थित होते.

Related posts

फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसविले | सुप्रिया सुळे

News Desk

सत्तास्थापनेसाठी कुमारस्वामींच्या आमदारांना लाच देण्याची भाजपची नवीन खेळी

News Desk

“मी कधीच माघार घेत नाही”, जितेंद्र आव्हाडांची ठाम भूमिका

Aprna