HW Marathi
मुंबई

मध्य रेल्वेचा सलग तिसऱ्या दिवशी देखील खोळंबा

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज (१२ जून) विस्कळीत झाली आहे. सलग तिसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  यामुळे ऑफिसला जाण्याच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने काल (११ जून) मध्य रेल्वेची दिवा ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेन थांबल्या होत्या. मुंबई मान्सूनपूर्व पाऊसाचे आगमन १० जून रोजी देखील मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ कोपरजवळ पेंटग्राफ आणि ओएचइमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे लोकल सेवा चांगलीच प्रभावित झाली होती. कोपरहून ८ वाजून ३ मिनिटानी कर्जत गाडी कोपर स्थानकतच अडकली होती.

Related posts

मुंबईच्या समुद्रात तीन मुले बुडाली

News Desk

मराठी उद्योजकांनो स्वत:च्या व्यवसायाचे मार्केटिंग करा- आशिष पेठे

News Desk

अंधेरी, प्रिंटींग प्रेसला लागली आग, एकाचा मृत्यू

Ramdas Pandewad