HW News Marathi
मुंबई

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

ठाणे | बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला आज (४ जानेवारी) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग विझविण्यासाठी खाजगी गाड्या देखील पाठविण्यात आल्या आहेत. या आगीत अद्याप जीवितहानी झाली नसून किती जण जखमी झाले यांची माहिती मिळाली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत वरुणराजाची हजेरी

News Desk

श्रीदेवी यांच्याविषयीच्या काही ‘खास’ गोष्टी!

Adil

मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस

News Desk