HW News Marathi
मुंबई

कल्याण-मुरबाड मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील

मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच अलिबाग ते पेणदरम्यान नवीनकॉरिडॉरचं काम गतिमान करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रविवारी (४ मार्च) आयोजित कार्यक्रमादरम्यान परळ टर्मिनसहून रेल्वे सेवा सुरू करतानाच उपनगरी रेल्वेमार्गावरील अनेक सुविधा आणि प्रकल्पांचे उद्घाटन दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बोलत होते. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा हा ७२६.४५ कोटी रुपयांचा प्रकल्प उल्हासनगरमार्गे जाणार असल्याने प्रवाशांना अधिक सोयीचा ठरेल. मुंबईत सुरू असलेल्या एमयूटीपी ३ आणि एमयूटीपी ३ अ प्रकल्पामुळे मुंबई रूप पलटणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण संत गाडगे महाराज स्थानक ते वडाळा या दरम्यानच्या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. आता संपूर्ण १९ किमी धावणारी मोनोरेल ही खर्‍या अर्थाने लोकोपयोगी झाली आहे. या मोनोतून दर महिन्याला सुमारे ३० लाख नागरिक प्रवास करतील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना विरोधात दाखल करण्याचे आदेश, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप

News Desk

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट

Aprna

धूलिकणांनी मुंबईकरांचा श्वास कोंडला

swarit