HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला आत्मपरिक्षणाचा सल्ला 

मुंबई – नांदेड महापालिकेत काँग्रेसचा विजय झाला हे आम्ही मान्य केले आहे. मात्र आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला काँग्रेस जिंकण्याचा जास्तच आनंद झालाय. मात्र त्यांना आधी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. नांदेड महापालिकेत भाजपला मागच्या वेळी केवळ ३ टक्के मते होती. मात्र ती संख्या वाढून २५ टक्क्यांवर गेली. शिवसेनेला मागिल निवडणूकीत १८ टक्के मते होती. ती घटून आता ६ टक्क्यांवर आली याकडे शिवसेनेने लक्ष दिले पाहीजे. जास्त आनंद करून समाधान व्यक्त करू नये तर त्यांनी आत्मपरिक्षण करावे असा सल्लाही त्यांनी मित्रपक्षाला दिला. या निवडणूकीत शिवसेना भूईसपाट झाली असेही ते म्हणाले. नांदेड हे आमच्यासाठी आव्हानच होते. लोकसभा विधानसभेतही काँग्रेसचीच सरशी झाली होती. मात्र विधानसभेला नांदेडमध्ये बाजी मारणाऱ्या शिवसेनेला तेवढेही महापालिका निवडणूकीत टिकवता आले नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नगरसेवक खरेदी प्रकरणावर नजर

मनसेचे नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी मार्मिक टिप्पणी केली. या प्रकरणावर आपली नजर आहे. शिवाय उद्धव आणि राज यांचे नाव न घेता या दोघांकडेही आपले लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किरीट सोमय्या यांनी नगरसेवक खरेदी बाबत जे आरोप केले आहेत त्या बाबत त्यांच्या बरोबर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांना वेळही देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांसाठी नवीन वर्सोवा-बांद्रे सी-लिंक

News Desk

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही सुरु, रुग्णांची परवड

News Desk

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

swarit