HW News Marathi
मुंबई

कोरोनासारखाचं आणखी १ विषाणू समाजात आलाय, मुख्यमंत्री कोणत्या विषाणूबद्दल बोलले ?

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. पुन्हा एकदा त्यांनी जनतेला संयमाने आणि धैर्याने या कोरोनाशी सामना करण्याचे आवाहन केले. कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्व जात, धर्म, पंथाचे लोक एकत्रित आले आहेत. तरी या संकटाच्या वेळी कोणीही धर्म, जात, पात याचे राजकारण करु नये. दिल्लीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची यादी दिल्लीतून आली असून त्यातील आपल्या जिल्ह्यातील १०० टक्के लोकांचा तपास पुर्ण झाला असून त्या सगळ्यांना सरकारी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तसेच, जसे कोविड-१९ चे रुग्ण वाढत आहेत तसेच काही रुग्ण बरे होऊन घरीही जात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक हॉटेल्सने युद्धात लढणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची सोय करतात.
  • काही ना काहीतरी खारीचा वाटा उचलत आहेत त्या सर्वांचे आभार मानतो.
  • मी माझ्या आवाहनात हात जोडतो, विनंती करतो हे शब्द वापतो. पण कोविड १९ सारखा आणखी एक व्हायरस समोर येत आहे.
  • जनतेला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन.
  • नोटांना थुकी लावून व्हिडीओ पसरवले जात आहेत. जर कोणी जाणूनबुजून अफवांचे व्हायरस पसरवत असाल तर खबरदार, तुम्हाला सोडणार नाही.
  • जनतेला मी कोविड पासून वाचवेन पण तुम्हाला माझ्या कायद्यापासून कोण वाचवणार नाही.
  • जात, पात, धर्म बाजूला ठेवून एकत्र आले आहेत त्याला गालबोट लावू देणार नाही.
  • महाराष्ट्राच्या एकीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन करणार नाही…
  • दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमातील लोकांची यादी दिल्लीहून आली आहे. त्यातील जवळपास १०० टक्के लोकांना सरकारी रुग्णालयाच्या विलगीरकण कक्षात ठेवण्यात आले आहे.
  • जसे कोविड-१९ चे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत तसेच काही रुग्ण हे बरे होऊन घरी जात आहेत.
  • ज्या रुग्णांचा कोविड-१९ मपळे मृत्यू झाला ते ज्येष्ठ नागरिक होते किंवा ज्यांना मधुमेह, ब्डल प्रेशर, यांसारख्या विविध व्याधी होत्या.
  • घरातील ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करताना त्यामूळे काळजी घ्या.
  • ५ लाख मजूरांच्या दोन वेळेच्या जेवणाची, एका वेळेच्या नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. बालक, महिला यांच्यासाठीही सुविधा करण्यात आल्या आहेत. या मजूरांसाठी वैद्यकीय सोयी-सुविधाही देण्यात आल्या आहेत.
  • केवळ कोविड-१९ च्या चाचणीसाठी रुग्णालये मुंबईत तयार करण्यात येणार आहेत.
  • पुढील सूचना येईपर्यंत कोणताही धार्मिक, राजकीय, क्रिडा कार्यक्रमाला परवानगी मिळणार नाही.
  • माझा माझ्यापेक्षा जास्त महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे.
  • कोरोनाच्या या लढाईत आपण जिंकणारच.
  • मुंबईकरांकडे जिद्द आहे, धैर्य आहे, संयम आहे, आत्मविश्वास आहे. आणि जर का आत्मविश्वास असेल तर कोणीही आपल्याला हरवू शकणार नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मरे’ची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांनी रुळांवर उतरून केला प्रवास

News Desk

‘त्या’ पाचही मुली सापडल्या…

News Desk

मोबाईलप्रमाणे आता सेट टॉप बॉक्सचे कार्ड देखील बदलता येणार

News Desk