HW News Marathi
मुंबई

शहीद कॉन्स्टेबल स्व. विलास शिंदे चौक

मुंबई | वरळी विभागात राहणा-या शहिद कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या स्मरनार्थ वरळीत चौकाचे नामकरण ४ मे रोजी सायंकाळी करण्यात आले आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे वरळी दूरदर्शन समोरील चौकाचे शहीद कॉन्स्टेबल स्व विलास शिंदे चौक असे नामकरण करण्यात आले आहे. या चौकाचे उद्घाटन शुक्रवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

शहीद कॉन्स्टेबल विलास शिंदे ऑगस्ट २०१६ मध्ये खार रोड येथे ऑन ड्यूटी असताना वाहतुकीचे नियम मोडणा-या तरुणांना अडवून शिंदे यांनी जाब विचारल्यामुळे या तरुणांनी शिंदे यांच्या डोक्यावर मागून वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. हल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

शहिद विलास शिंदे यांना मृत्यू नंतर सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शहीद घोषित केले. शिंदे यांच्या कार्याचे स्मरण रहावे म्हणून यापूर्वीही लोअर परळच्या एका उद्यानाला शहिद शिंदे यांचे नाव देण्यात आले असून शुक्रवारी सायंकाळी वरळीत एका चौकाला त्यांचे नाव देण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उंदरासाठी १३० कोटीचं घर 

News Desk

इमारत दुर्घटनेतील आरोपी बालंबाल बचावला

News Desk

जेव्हीएलआरला ‘संत शिरोमणी श्री गाडगे महाराज मार्ग’ नाव देण्याचा प्रस्ताव मंजुर

Gauri Tilekar