Connect with us

मुंबई

संविधान सन्मान लाॅग मार्च

News Desk

Published

on

मुंबई | पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा २६ नोव्हेंबर २०१८ पासून भीमा कोरेगाव पुणे ते चैत्यभूमी दादर हा २२० किलोमीटरचा संविधान सन्मान लाॅग मार्च आज (६ डिसेंबर) रोजी दादर चैत्यभूमी येथे पोहोचला. या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष  जयदीपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मार्चमध्ये गणेशभाई उन्हवणे जगनभाई सोनावणे अजमलभाई पटेल चरणदास ईंगोले,शशीभाई उन्हवणे संतोष सोनावणे.

महेश कदम या प्रमुख पदाधिका-यांसह संविधान प्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठीक ठिकाणी या मार्चचे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संविधान बदलने की मंशा रखनेवालो को संविधान प्रेमी जनता उखाड देगी असा विश्वास जयदीपभाई कवाडे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई

मालाडमध्ये भीषण आग

News Desk

Published

on

मुंबई | मालाड येथील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, ही आग लागण्याची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Continue Reading

मुंबई

रविवारी मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

News Desk

Published

on

मुंबई | मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप धिम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरू राहील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील व २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला व वाशी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या मार्गावरील जलद अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल व या कालावधीत या गाड्या अप व डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

मध्य रेल्वेच्या निळजे ते कळंबोली स्थानकादरम्यान विशेष

रविवारी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचा नियमित मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलेला असताना निळजे-कळंबोली मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी आणि मंगळवारी या मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याने अनेक या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला असून काही गाड्या रद्द केल्या आहेत.

मध्य रेल्वेतर्फे रविवारी निळजे ते कळंबोली दरम्यान सकाळी ९.५० ते दुपारी ४.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ९.५० ते दुपारी १२.५० वाजेपर्यंत ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 

Continue Reading

HW Marathi Facebook

December 2018
M T W T F S S
« Nov    
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

महत्वाच्या बातम्या