HW Marathi
मुंबई

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा | शरद पवार

मुंबई | “मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मुंबईत आज (१५ मार्च) शरद पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर देशातील महत्त्वाच्या काही मुद्दयावर पत्रकार परिषद घेतली. मुंबईतील या पुलाचे ऑडीट झाले होते. त्याचीच चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी यावेळी केली.

“मुंबईत काल झालेला अपघात हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. या राजधानीत विरार ते चर्चगेट, कर्जत ते सीएसटी रोज १ कोटी लोक प्रवास करतात. या मार्गावर अनेक लोकांचे विविध कारणाने अपघात होतात. दिवसाला १५ ते २० अपघात होतात. वर्षाला ३ हजार लोकांचा मृत्यु होतो. महिन्याला २-३ हजार प्रवासी जखमी होतात. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे असे सांगतानाच पहिल्यांदा रेल्वे स्टेशनची सुधारणा करणे गरजेचे आहे”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

मध्य रेल्वेने ११ नोव्हेंबर २०१५ ला राज्य सरकारला पत्र दिले होते. या पत्रात मुंबईतील ओव्हर ब्रिजच्या दुरावस्थेची माहिती दिली होती. हे पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवत या पत्रानंतरही सरकारने किंवा महानगरपालिकेने गांभीर्याने घेतले नाही, याबाबत शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Related posts

रेल्वे तिकीट आरक्षणासाठी आधारकार्ड बंधनकारक

News Desk

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

News Desk

शेतकरी कर्जमाफीसाठी उत्तरप्रदेश मॉडेलचा अभ्यास – मुख्मयंत्री

News Desk