मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील गुरुवारी (१५ मार्च) दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, ३० हून अधिक लोक जखमी झाले. जखमींची प्रकृतीही गंभीर आहे.
या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम ३०४ एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis after meeting those injured in footover bridge collapse in Mumbai: There are around 10 injured admitted in the ward, one in ICU; all out of danger now. High-level enquiry will be done to probe into the matter. FIR has been lodged. pic.twitter.com/gBgsukeKe2
— ANI (@ANI) March 15, 2019
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. “संध्याकाळपर्यंत या दुर्घटनेचा जबाबदारी कोणाची हे निश्चित करा,” असा आदेश मुख्यंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही अशा घटना घडणे हे धक्कादायक आहे. ज्या पुलांचे ऑडिट झाले का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.