HW News Marathi
मुंबई

दाऊदची पत्नी मुंबईत आली होती

ठाणे खंडणी मागितल्या प्रकऱणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक धक्कादाय खुलासा इकबाल कासकरने केला आहे. दाऊद इब्राईमची पत्नी 2016 मध्ये भारतात आली होती असा धक्कादायक खुलासा इकबाल कासकरने पोलिसांसमोर केला आहे.

2016 मध्ये एका नातेवाईकाच्या अंत्यस्कारावेळी दाऊदची पत्नी मेहजबीन भारतात आली होती. त्यावेळी आम्ही भेटलो होतो. ती काही काही दिवस वर्सोवा येथे वास्तव्यास होती. ती पाकिस्तानच्या पासपोर्टच्या आधारावर भारतात आली होती अशीही माहिती कासकरने ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर चौकशीदरम्यान केला आहे. ‘फोन टॅप होत असल्याच्या भीतीने दाऊद गेल्या तीन वर्षांपासून माझ्याशी आणि इतर नातेवाईकांच्या संपर्कात नाही. मात्र मी आपला दुसरा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचा दावा त्याने केला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन अनीस ईद आणि इतर सणांना फोन करतो असं इकबाल कासकरने सांगितलं आहे. 1993 स्फोटातील आरोपी आपला मोठा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचं मान्य केलं आहे’, अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झाड कोसळून सातरस्ता येथे दोन गाड्यांचे नुकसान

swarit

दबंग शिवदीप लांडेंची धडक कारवाई

News Desk

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा | शरद पवार

News Desk