मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने विजय मिळवत विरोधी पक्षाला धुळ चारली. तसेच सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत अरविंद केजरीवाल यांनी हॅट्रिक केली आहे. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांचे अनेक नेत्यांनी अभिनंदन केले होते. अभिनंदनकर्त्यांच्या या यादीतील एक नाव म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा. मिलिंद देवरा यांनी केजरीवालांचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले आहे ज्यामुळे मुख्यमंत्री केजरीवालांचे गुणगान गायल्याने ज्येष्ठ नेते अजय माकन चांगलेच संतापले आहेत.
मिलिंद देवरा यांनी रविवारी (१६ फेब्रुवारी) रात्री ट्विटरवर अरविंद केजरीवालांचा एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये केजरीवाल ‘आप’ सरकारच्या कार्यकर्तृत्वाची स्तुती करताना दिसत आहेत. दिल्लीला गेल्या पाच वर्षात आपला महसूल दुप्पट झाला याचे यश कसे मिळाले, दिल्लीचे उत्पन्न आता ६० हजार कोटींवर पोहचले आहे, असे देवरांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. अरविंद केजरीवाल यांनीही देवरा यांच्या व्हिडिओ रिट्विट केला होता.
Sharing a lesser known & welcome fact — the @ArvindKejriwal-led Delhi Government doubled its revenues to ₹60,000 crore & maintained a revenue surplus over the last 5 years.
Food for thought: Delhi is now one of India’s most fiscally prudent governments pic.twitter.com/bBFjbfYhoC
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) February 16, 2020
आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाबद्दल आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दलचे हे गुणगान न आवडल्याने अजय माकन यांनी ‘अर्धवट तथ्य’ असलेल्या गोष्टी सांगू नका किंवा काँग्रेस पक्षा सोडा, असा इशारा देवरा यांना ट्विट मार्फत दिला. तसेच ‘भावा, तुला काँग्रेस सोडायची असेल, तर खुशाल जा. मला फारशी माहित नसलेली गोष्ट सांगू दे’ असे म्हणत माकन यांनी ट्विटद्वारे आकडेवारीही मांडली आहे.
Brother,you want to leave @INCIndia-Please do-Then propagate half baked facts!
However,let me share even lesser know facts-
1997-98-BE (Revenue) 4,073cr
2013-14-BE (Revenue) 37,459cr
During Congress Govt Grew at 14.87% CAGR2015-16 BE 41,129
2019-20 BE 60,000
AAP Gov 9.90% CAGR— Ajay Maken (@ajaymaken) February 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.