HW News Marathi
मुंबई

सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का ?

मुंबई | भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.

संभाजी भिडेला अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत. संभाजी भिडे याला अटक का होत नाही असा सवाल करतानाच धनंजय मुंडे यांनी सभागृहातील सर्व विषय बाजुला ठेवून भिडे यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी अशी मागणी केली.

आज विधानपरिषदेमध्ये संभाजी भिडे याला अटक का करण्यात आली नाही याविषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी सभागृहामध्ये आमदार भाई जगताप, आमदार कपिल पाटील, आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही संभाजी भिडे याच्या अटकेची मागणी केली.

दरम्यान रत्नागिरीच्या खेड येथेही रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना झाली आहे. एकीकडे भीमा कोरेगाव प्रकरण ताजे असताना अशापध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना सुरु आहे. या सरकारमध्ये महापुरुषांच्या पुतळयांची विंटबना सुरु असून समाजकंटकांना सरकारची भीती राहिलेली नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

रत्नागिरी – खेड प्रकरणातही सरकारने निवेदन करावे अशी मागणीही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकच्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल

News Desk

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तळमजल्यावर लागलेली आग आटोक्यात

News Desk

मुंबईकरांची तारांबळ करून, भाजपचे जोरदार प्रदर्शन

News Desk