HW News Marathi
मुंबई

द्रविता सिंग राहिली स्वत:च्या पायावर उभी

मुंबई | कल्याण येथे राहणारी तेवीस वर्षांची द्रविता सिंग गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात लोकल ट्रेनच्या दरवाज्यात उभी राहून प्रवास करत होती. त्यावेळी एका मोबाईल चोराने तिच्यावर हल्ला केला . चोरामुळे जखमी झालेली द्रविता धैर्य आणि निश्चयाच्या बळावर पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभी राहीली आहे.

यासाठी भाटिया रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. शैलेश रानडे आणि त्यांच्या टीमचे द्रविताने आभार मानले.या अपघातात जबर जखमी झालेल्या द्रविताला शुक्रवारी भाटिया रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने ती सध्या चालायचा प्रयत्न करत आहे.

लोकल ट्रेनच्या दारात उभी राहून ती फोनवर बोलत असताना रेल्वे सिंग्नलच्या खांबावर बसलेल्या एका १७ वर्षांच्या चोराने तिच्या डोक्यावर बांबूने आघात केला. हा हल्ला केल्यामुळे ती खाली पडली आणि शेजारच्या रुळावरून जाणाऱ्या ट्रेनखाली तिचा हात व पाय आला.

या रेल्वे ट्रेनमध्ये हल्ल्यात द्रविताने डाव्या हाताची करंगळी पूर्णपणे आणि मधल्या बोटाचा तसेच अनामिकेचा काही भाग गमावला आहेत. उजव्या पायाचा अंगठाही तीला गमवावा लागला. ट्रेन अंगावरून गेल्यामुळे डावा हात आणि उजवे पाऊल चिरडले गेले होते. तिने स्वत: पाऊल टाकून केलेली प्रगती तिच्या प्रकृतीतील पुढील सुधारणेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ घोषणा

News Desk

अजमेरा बिल्डरला ५०० कोटीचा फायदा केल्याचा BMC वर आरोप; भाजप आमदरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Aprna

इंदिरा गांधीवरील ठरावावरून दोन्ही कॉँग्रेस आमने-समाने

News Desk
देश / विदेश

दाऊदची संपत्ती जप्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk

नवीदिल्ली |सुप्रिम कोर्टाने दाऊद इब्राहिमच्या संपत्ती संदर्भात शुक्रवारी निकाल देत सरकारला दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली आहे. दाऊदची बहीण हसीना पारकर आणि आई अमीना बी यांच्या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने मुंबईतील दाऊदची करोडो रुपयांची संपत्ती जप्त होणार असल्याचे म्हटले आहे.

अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मुंबईच्या नागपाडा येथे करोडो रुपये किंमतीची संपत्ती आहे. एवढेच नाही तर त्यापैकी दोन संपत्ती अमीना व पाच संपत्ती हसीना यांच्या नावावर आहेत.

दाऊदची ही संपत्ती बोकायदेशीर असल्याचे तपास यंत्रनेला आढळून आले आहे त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली आहे. दाऊदची बहीण हसीना आणि आई अमीना यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. संपत्ती जप्त करण्याच्या नोटीसला आव्हान देण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात यावा अशी मागणी करत आपल्याला योग्यरित्या नोटीस देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर संबंधित विभांगाने त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली. त्यामध्ये केंद्र सरकारने गतवर्षी दाऊदच्या दक्षिण मुंबईतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा लिलाव केला.

 

Related posts

सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी उठविली

News Desk

सूर्याच्या दिशेने झेपावले ‘सोलर प्रोब यान’, नासाची ऐतिहासिक झेप

News Desk

खनिज तेल खरेदीवरून अमेरिकेची भारताला इशारा वजा धमकी

News Desk