HW Marathi
मुंबई राजकारण

फ्लिपकार्टसेवा काही काळासाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टनेही आपल्या सर्व सेवा काही काळासाठी बंद केल्या आहेत. “काहीकाळासाठी आमच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आम्ही लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न करु. सध्या खूप कठीण परिस्थिती आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमच्या घरी राहा, बाहेर फिरु नका”, असा मेसेज फ्लिपकार्ट वेबसाईट सुरु करताच येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लागण ज्या पुण्यातील दाम्पत्यांना झाली होती त्यांना आज (२५ मार्च) नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, भारत लॉकडाऊन जरी असला तरी अत्यावश्यक सेवा या सुरुच राहणार आहेत. सामान्य नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे.

 

Related posts

…तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही !

Gauri Tilekar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत – संजय राऊत  

News Desk

कृषी विधेयकावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं चित्र संसदेत दिसलं, सामनातून केंद्रावर टीका

News Desk