मुंबई | सलग तीन दिवस पावसाची संततधारीमुळे मुंबईच्या तिन्ही मार्गावर रेल्वे लाईन विस्कळीत झाली आहे. मुंबईत आज (१ जुलै) पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे खोळंबल्या आहेत त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झालेत. मध्य रेल्वेची वाहतूक ४० ते ४५ मिनिटे तर हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वेवर सायन रेल्वे ट्रँकवर पाणी साचल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल कुर्ला स्ठानकात रखडल्या आहेत.
Restoration work on slow lines at Marine Lines is in full swing after bamboos of ongoing construction work fell on OHE due to heavy winds. Trains on both the fast lines working between Churchgate-Mumbai Central. Restoration of slow lines at Marine Lines expected soon. #WRUpdates pic.twitter.com/UWk1OdvT3f
— Western Railway (@WesternRly) July 1, 2019
पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मरीन लाईन्स-चर्चगेट वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वेवर मानखुर्द-चुनाभट्टीजवळ ट्रॅकवर पाणी साचले आहे त्यामुळे येथील लोकल ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. मांटुगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.
Train movement has been started at Palghar in Mumbai Division at 08.05 hrs (1/7/19). It was stopped after very heavy rains {361 mm}. Here is the consolidated details of cancellation/short termination etc. #WRUpdates pic.twitter.com/dVy7f5y7e9
— Western Railway (@WesternRly) July 1, 2019
मुसळधार पावसामुळे पालघर जलमय झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.
LIVE Rain update
- भिंवडीत जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले
#WATCH Maharashtra: Waterlogged streets in Bhiwandi area of Thane after heavy rains lashed the region. pic.twitter.com/gBnxXitRiV
— ANI (@ANI) July 1, 2019
- मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओसंडून वाहू लागली आहे.
- पालघरमधील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस
Mumbai: Waterlogged streets in King Circle area. #MumbaiRain pic.twitter.com/SdGlep0Xpw
— ANI (@ANI) July 1, 2019
- मुंबईच्या किंग सर्कल पाणी साचले आहे
Mumbai: Heavy traffic jam in Bhakti Park area, Eastern Freeway. #MumbaiRain pic.twitter.com/u5YZCkPjBC
— ANI (@ANI) July 1, 2019
- पावसामुळे ईस्टन फ्रीवेवर गाड्याच्या लांबच लाग रांगा
- वरळी, दादार, माटुंगा आणि लालबाग परिसरात पाऊस
- विक्रोळी, कांजुर मार्ग, मुलुंट, घाटकोपर येथे जोरदार पाऊस
- मध्य रेल्वेची वाहतूक ४५ मिनिट उशीराने धावत आहे.
- पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाची दमदार हजेरी
- मुंबईत जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले
Mumbai: Water logging at Sion Railway Station after rainfall in the region. #Maharashtra pic.twitter.com/YQTAVFXaYo
— ANI (@ANI) July 1, 2019
- घाटकोपरमध्ये झाड कोसळून १० रिक्षांचे नुकसान झाले आहे.
- सायन रेल्वे स्थानकात ट्रँकवर पाणी साचले आहे
- मुसळधार पावसामुळे घेतला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
- कुर्ला, सायन आणि माटुंगा परिसरातील बहुतांश शाळांनी जाहीर सुट्टी जाहीर केली आहे
- डोंबिवलीच्या पुढे अप मार्गावरील वाहतूक संथ गतीने
- या स्थानकांदरम्यान रेल्वेसेवा ठप्प
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.