HW News Marathi
मुंबई

उत्सवाच्या काळात ‘परे’ची कारवाई

उत्सवाच्या काळात ‘परे’ची कारवाई, १ कोटींचे आरक्षित तिकीट जप्त तर अतिरीक्त गाड्यांमुळे १५ कोटींची अतिरीक्त कमाई

मुंबई | मुंबईच्या पश्चिम रेल्वेकडून सणासुदीच्या काळात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यावर आकस्मिक छापे मारण्यात आले. यामध्ये अनेक हाय प्रोफाइल तिकीट दलालांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान तब्बल १ कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या आरक्षित तिकीट जप्त करण्यात आल्या. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

तसेच सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वे कडून १ ऑगस्ट पासून तीन महिन्याच्या कालावधीत विविध स्पेशल गाडया चालवण्यात आल्या आहे. जवळपास ११८८ विशेष ट्रेन चालवण्यात आल्या. तर विविध गाडयांना २१२६ अतिरिक्त डब्बे जोडण्यात आले होते. येत्या ख्रिसमस पर्यंत यातील काही विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे.

तीन महिन्यात पश्चिम रेल्वेकडुन चालवलेल्या या विशेष गाडयांमधून तब्बल १ लाख पेक्षा जास्त प्रवाश्यांनी प्रवास केला. ज्यामधून ९.६५ कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल रेल्वेला प्राप्त झाला आहे. तर अतिरिक्त डबे जोडल्यामुळे ६८ हजार प्रवांश्याना त्याचा लाभ घेता आला. त्यातून रेल्वेला ५.३४ कोटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मालाडमध्ये भीषण आग

News Desk

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

News Desk

अमेरिकी महिलेच्या कॅमेऱ्याने जगापुढे आणली कामाठीपुराची वस्तुस्थिती,अंडरवर्ल्डचा मोठा अड्डा

News Desk
व्हिडीओ

पंधरा दिवसांत मिळणार मराठा समाजाला आरक्षण !

News Desk

गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे 1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा”, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना दिले.

Related posts

BJP-Congress-NCP | सर्वात जाड कातडी असलेला प्राणी म्हणजे ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ !

Gauri Tilekar

आता भाजपचे Suresh Dhas अडचणीत! इनामी जमीन बळकावून तब्बल १००० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

News Desk

Sanjay Raut यांचं मोठं विधान! BJP सोबत कधीच कटूता नव्हती…

News Desk