HW News Marathi
मुंबई

नीरव मोदींच्या मालमत्तांवर ईडीचे छापे,5,100 कोटींचे हिरे जप्त !

मुंबई – नीरव मोदीने पीएनबी बँकेला लेटर ऑफ अंडरटेकिंग घोटाळ्यात तब्बल ११,५०० कोटीचा चुना लावल्याने ईडीने मोदींच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आली आहे. या छप्यात मोदींच्या गितांजली जेम्स या शोरूममधून ५१०० कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने हस्तगत केले. त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील जप्त केल्या आहेत.

मोदींच्या मुंबई, सुरत आणि नवी दिल्ली या ठिकाणांच्या कार्यालये, शोरुम्स आणि वॉर्कशॉप्सवर ईडीने छापे मारले आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारत डायमंड बॉर्समधील फायरस्टार डायमंड प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्यालय, कुर्ला पश्चिममधील कोहिनूर सीटीमधील मोदीचे खासगी कार्यालय, शारुम्स तसेच दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील इट्स हाऊस येथील बुटीक आणि लोअर परळ येथील पेनिंसुला बिझनेस पार्कमधील वर्कशॉपवरही ईडीने छापे मारून तेथील मालमत्ता जप्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आकाशवाणीचे वृत्त निवेदक संपावर

News Desk

#26/11Attack : अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याची माहिती देणाऱ्याला ३५ कोटींचे बक्षीस

News Desk

नेहरूनगर येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी! – मंगलप्रभात लोढा

Aprna
महाराष्ट्र

एकाच क्रीडा संकुलाचे दोन वेळेस उद्घाटन, होय ! उल्हासनगर में कुछ भी होता है,

swarit
  • प्रसिद्धी आणि कामाचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे उपद्व्याप-धनंजय बोडारे

उल्हासनगर शहरातील विविध विकासकामाचे गुरुवारी राज्यमंञी रविंद्र चव्हाण ह्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.माञ या कामावर शिवसेने व अन्य विरोधी पक्षाने बहिष्कार घातला.एकाच कामाचे पुन्हाःपुन्हा उद्घाटन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्या महिन्यांत ६ जानेवारी २०१८ रोजी शहरातील बाळासाहेब क्रीडा संकुलाचे नुतनीकरण आणि १४ नंबर महानगरपलिका शाळेचे उद्घाटन करण्यात आले आणि विध्यार्थ्यांना शाळा आणि नागरिकांना क्रीडा संकुल खुले करण्यात आले,हे उद्घाटन कल्याण चे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडलं.दरम्यान आता कालच (गुरुवारी) 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा वरील वास्तु चं उद्घाटन रायगड चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं.एकदा उद्घाटन झालेल्या वास्तू च पुन्हा उद्घाटन करून येथील सत्ताधारी प्रसिद्धी आणि कामाचे श्रेय लाटण्यासाठी हे उपद्व्याप भाजपाने चालवले असल्याचे शिवसेनेचे उल्हासनगर महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेता धनंजय बोडारे यांनी म्हटलं आहे.

Related posts

शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली! – नाना पटोले

Aprna

कोटक महिंद्रचे सीईओ यावेळी केवळ १ रुपये पगार घेणार !

News Desk

Live Update : १६९ आमदारांसह महाविकासआघाडीकडून बहुमत सिद्ध

News Desk