HW News Marathi
मुंबई

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा, लवकरच करणार राजकारणा एन्ट्री

मुंबई | एन्काऊंटर स्पेशालिस्ट ओळखले जाणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शर्मा यांनी ४ जुलै रोजी राजीनामा दिला आहे. परंतु शर्मा यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. शर्मा सध्या ठाणे क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते, राजीनामा दिल्यानंतर यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणुक हे येणारा काळच सांगले. परंतु शर्मा हे अंधेरी किंवा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

पोलीस दलात १९८३ साली दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द कायम वादात राहिली. ऐंशी-नव्वदच्या दशकात मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले असताना, अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर मोहिम हाती घेतली होती. शर्मा यांनी प्रदीप शर्मा यांनी ३१२ एन्काऊंटरमध्ये भाग घेत,१०० हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना २००८ मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट २०१७ मध्ये पोलीस सेवेत ते पुन्हा परतले.

प्रदीप शर्मा यांचा अल्प परिचय

1983 बॅचचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा सर्व्हिस रेकॉर्ड वादांनी भरलेला आहे. शर्मा यांनी आतापर्यंत ११३ एन्काऊंटर सामील झाले असून शर्मा यांच्या नावावर १०० पेक्षा जास्त एन्काऊंटरची नोंद आहे. ‘अब तक ५६’ हा सिनेमात शर्मा यांच्यावर आयुष्यावर बनला होता. शिक्षकाचा मुलगा असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर ‘रेगे’ नावाचा मराठी चित्रपटही बनला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंद्रायणीने पती पीटरला घटस्फोटाची नोटीस पाठवली

News Desk

मुंबईत कोणत्या सेवा राहणार बंद ?

News Desk

मेट्रो ३ सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास पूरक ठरेल! – मुख्यमंत्री

News Desk