HW News Marathi
मुंबई

महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी धारावी भाजप अध्यक्षावर गुन्हा दाखल

मुंबई | धारावी विधानसभेची २०१४ ची निवडणूक लढविलेल्या भाजप मुंबई सचिव दिव्या ढोले यांना त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी असगर शेख यांच्या मोबाईलवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे धारावी मंडळ अध्यक्ष मनी बालन यांच्यावर धारावी पोलीस ठाणे येथे काल (शनिवारी) रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे धारावीत खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून उच्चशिक्षित व गेली १५ वर्षापेक्षा जास्त काळ पक्ष कार्यकर्त्या असलेल्या मुंबई भाजप सचिव दिव्या ढोले ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या माध्यमातून धारावीतील अनेक प्रश्न मार्गी लावून सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवत आहेत. जनमानसात आपले नाव करणाऱ्या दिव्या ढोले यांचा प्रभाव वाढत असल्यानेच व आपल्याला पुढे विधानसभेची तिकीट मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानेच बालन हे एवढ्या खालच्या पातळीवर उतरले असल्याचे म्हटले जाते. घाणेरडे वक्तव्य,अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून महिलेची बदनामी, मानहानी व महिलेस लज्जा येईल असे वक्तव्य केल्याबद्दल कलम ५०० व ५०९ अंतर्गत बालन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

गुन्हा नोंद करायच्या आधी वरिष्ठ नेत्यांना पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती नेत्यांना देऊनही वरिष्ठांनी त्याची दखल न घेतल्याने शेवटी हा टोकाचा निर्णय ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या विश्वस्त व भाजप मुंबई सचिव दिव्या ढोले यांनी घेतला आहे. पक्षात जर एखाद्या महिलेचा आदर होत नसेल महिलांना चुकीची वागणूक दिली जात असेल महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पक्ष पाठीशी घालत असेल तर सर्वसामान्य महिलांना कसे संरक्षण देणार, असा सवालही ढोले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

“धारावीत गेली पाच वर्षे महिला पदाधिकारी नेमणूक करण्यात आलेली नाही. आमच्या सारख्या महिला पक्ष वाढवण्याचे काम करूनही जर न्याय मिळत नसेल तर काय ? म्हणून माझ्यासोबत असलेल्या महिलांच्या आग्रहाखातर व माझ्यावर विनाकारण झालेल्या अन्याय व बदनामी विरुद्ध मी रीतसर धारावी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला आहे,” असे दिव्या ढोले यांनी सांगितले आहे. या गुन्ह्यामुळे भाजप पक्ष आता काय निर्णय घेणार व अशा पदाधिकाऱ्यावर कोणती कारवाई करणार याकडे धारावीतील भाजप पक्षातील महिला पदाधिकारी व धारावीतील समस्त नागरिक विचारत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

मुंबई भाजपाची निवडणुक समिती जाहीर

News Desk

पुण्यात चोविस तासाच दोन ठिकाणी गोळीबार

News Desk