मुंबई | मुंबईतील लालबाग परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत २० जण होरपळून जखमी झाले आहेत. जखमींना केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मुंबईच्या लालबाग इथं साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस बाटल्याचा स्फोट झाला. या भीषण स्फोटामध्ये तब्बल २० स्थानिक नागरिक जखमी झाले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली असून, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
20 people injured in a cylinder blast in Lalbaug area of Mumbai, Maharashtra. Two fire brigade and two jumbo tankers are on the spot: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) December 6, 2020
मागील काही दिवसांपासून स्फोट झालेल्या खोलीमध्ये गॅस गेल्या वास येत होता. आज सकाळी वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी स्थानिक नागरिक शोध घेत गेले असता अचानक स्फोट झाला. या भयंकर स्फोटात परिसरातील तब्बल २० जण आगीत होरपळून जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.