HW News Marathi
मुंबई

प्रभादेवीच्या ब्यूमॉंन्ट इमारतीला आग

मुंबई | प्रभादेवीच्या वीर सावरकर मार्गावर असलेल्या ब्यूमॉंन्ट या इमारतीला बुधवारी दुपारच्या सुमारा भीषण आग लागली. या इमारतीच्या ३३ व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती हाती आली आहे. आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या १० गाड्या आणि ३ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले असून सध्या आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी २ वाजून १६ मिनिटांनी मिळाली. याच इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोणचे घर आणि ऑफिसही असल्याची माहिती मिळते. इमारतीच्या २६ व्या मजल्यावर दीपिकाचा ४ बीएचकेचा फ्लॅट असून तिने फ्लॅट २०१० मध्ये १६ कोटी रुपयांत खरेदी केला होता. याशिवाय अनेक उद्योजकांची कार्यालयेही या इमारतीत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, १०० जणांची सुखरुप सुटका करण्यात आली असून ६ फायर इंजिन,५ जंबो टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील डंपिंग ग्राऊंड आता अंबरनाथमध्ये हलवणार

News Desk

‘मरे’ची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांनी रुळांवर उतरून केला प्रवास

News Desk

दबंग शिवदीप लांडेंची धडक कारवाई

News Desk