मुंबई | डहाणू आणि वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या दोन डब्ब्यांना भीषण आग लागली. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबई-गुजरातदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धीम्या गतीने सुरु आहे. या आगीमुळे फटका लांबपल्ल्याच्या १२ गाड्या रद्द केल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या पीआरओकडून सांगण्यात आले आहे.
Fire in two bogies of a goods train near Dahanu Road Station of Mumbai division last night: 12 trains have been cancelled and 10 trains have been short-terminated.
— ANI (@ANI) November 9, 2018
ही आग कौंनराज नावाच्या मालगाडीला लागली तर दुसरी मालगाडी सुरतकडून जेएनपीटीला जाणाऱ्या दोन डब्ब्यांना वाणगाव-डहाणू रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या पाले दांडीपाडासोर आग लागली. ओव्हरहेड वायर तुटल्याने या मालगाडीच्या ऑईल असलेल्या डब्ब्यांना आघ लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Train 12936 (Surat – Bandra T) of 9-11-18 Will Be Cancelled. 59039 (Virar-Valsad ) of 9-11-2018 is Cancelled. @drmbct
— Western Railway (@WesternRly) November 9, 2018
सौराष्ट्र मेल रवाना करण्यात आली असून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्या डहाणू पलिकडील रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. तसेच वसई रोड-बोईसर, बोईसर-वसई रोड, डहाणू-पनवेल, तसंच सुरत वांद्रे, विरार-वलसाड या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटरवर दिली.
Fire incidence in goods trn near Dahanu Rd in night, 61002 (Domivli-Boisar) of 9-11-18 is short Terminated at Vasai Rd & Cancelled bet Vasai Rd -Boisar. 61001 Boisar-Vasai Rd of 9-11-18 is cancelled. 69164 Dahanu Rd–Panvel of 9-11-18 is Cancelled bet Dahanu Rd -Vasai Rd @drmbct
— Western Railway (@WesternRly) November 9, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.