HW News Marathi
मुंबई

कुर्ला स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणारी पहिली लोकल रवाना

मुंबई | मुंबई, ठाण्यासह उपनगरांत बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता हार्बरसह मध्य रेल्वेच्या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मानखुर्द स्थानकात ओव्हरहेड वायरवर पुलाचा स्लॅब कोसळल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, कुर्ला आणि वडाळादरम्यान पाणी साचल्याने यादरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर नुकतीच कुर्ला स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणारी पहिली लोकल रवाना झाली आहे. कुर्ला ते कल्याण, खोपोली, कसारा अप-डाऊन धीम्या मार्गावरून वाहतूक सुरु झाली आहे. मुंबईसह उपनगरांत शुक्रवारपासूनच (२ ऑगस्ट) मुसळधार पाऊस पडत आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे मोबाईल लंपास

swarit

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘परळ टर्मिनस’चे लोकार्पण

News Desk

वरिष्ठांनी झापले म्हणून कर्मचा-याने घेतला गळफास

News Desk