May 24, 2019
HW Marathi
मुंबई

स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदाच कळले !

मुंबई | “सीएसएमटी पूल दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली आहे. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यू झाला त्यांची लहान मुले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

“मुंबई महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेलाच जाब विचारला पाहिजे. तकलादूपणा बंद करा. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. त्यानंतरही ही घटना घडली. याचा अर्थ स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदा कळले आहे. ऑडिट करताना वरवर काम केले गेले. त्यामुळे ही घटना घडली आहे”, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती. शिवसेनेने मुंबईचे वाटोळे केले”, अशी जोरदार टिका जयंत पाटील यांनी केली आहे. “जी टी रुग्णालयाच्या महिला कर्मचाऱ्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी पालिका आणि रेल्वे विभागाने टोलवाटोलवी केली. लोकांचे प्रश्न सोडवा, टोलवाटोलवी करू नका. भुयारी मार्ग निर्माण करा, ज्यामुळे पुन्हा अशा घटना घडणार नाहीत”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Related posts

… तर मुंबई वाहतूक पोलिसांनी कोटयावधी रुपयांच्या कमाईवर सोडले पाणी

News Desk

वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरी, आज दर्शनासाठी मंदिर बंद

News Desk

बोटीतून गरोदर महिलेला रुग्णालयात पोहचवले

News Desk