HW News Marathi
मुंबई

 पाचशे वर्षापूर्वीच्या तंत्रज्ञानाद्वारे नाक रोपन

मुंबई-युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी इटलीमध्ये ५०० वर्षांपूर्वी विकसित केलेल्या तंत्राने दुर्मीळ शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी १८ वर्षांच्या नगरच्या तरुणीला नवे नाक बसविले!

जन्मत:च एक नाकपुडी नसल्याने इतकी वर्षे चपटे नाक घेऊन लाजेने जगणाऱ्या व श्वसनाचा त्रास सहन करणा-या कोमल डहाळे हिला या शस्त्रक्रियेमुळे नवे आयुष्यच मिळाले. लातूर व अहमदनगरमध्ये कोमलवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कुटुंबीयांनी बरेच प्रयत्न केले.

‘टॅग्लिआकॉझी’ या शस्त्रक्रिया पद्धतीत एका हातातून रक्तवाहिन्यांसह एक त्वचेची नळी तयार केली जाते. ती नळीची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत जवळपास चार आठवडे लागतात. त्याच्याखाली आपल्या शरीरातील सपोर्टसाठी कुठल्या तरी भागाची थोडीशी चामडी लावली जाते.

त्यातून रक्तपुरवठा होत असतो. त्यानंतर या नळीच्या एका बाजूचा रक्तप्रवाह कमी केला जातो आणि ती नळी तीन आठवड्यानंतर नाकाला जोडली जाते.शस्त्रक्रिया करुन नाकाच्या भागात मांसासह तिथे ती नळी फिक्स केली जाते. त्यानंतर त्या रुग्णाला त्याचा हात जवळपास तीन आठवडे तसाच ठेवावा लागतो. नाक तयार झाल्यानंतर त्वचेची नळी नाकापासून वेगळी केली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या…!

News Desk

ऐरोलीमध्ये दुकानाला आग, आई-मुलीचा गुदमरुन मृत्यू

swarit

भारतात प्रथमच दहा शहरांत ई-स्पोर्ट स्पर्धा होणार

swarit