HW News Marathi
मुंबई

एलफिस्टन पुलावर चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या नातेवाईकाना पाच लाखाची मदत – विनोद तावडे

मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घटना स्थळी भेट दिली. मृत्यू झालेल्या घरच्यांना पाच लाखांची मदत राज्यसरकारकडून देण्याची घोषणा विनोद तावडे यांनी केली आहे.

आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील

अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा ब्रिज तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.

दुर्घटनेनंतर जखमी झालेल्या प्रवाशांना इतरांनी तातडीने मदत केली. जखमी आणि मृतांना मिळेल त्या वाहनांमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणात १७०० दुकानदार रस्त्यावर

Gauri Tilekar

घाटकोपरमध्ये मनसेची पोस्टरबाजी, राम कदम यांची उडवली खिल्ली 

swarit

मतदान करा, लॉजिंगमध्ये डिस्काऊंट घ्या

News Desk