HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या पावसाने घेतला पाच जणांचा बळी

तुफान पावसाने मुंबईकरांना झोडपून काढल्यानंतर बुधवारी मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. बुधवारी सकाळपासून सर्व मार्गावरील रेल्वेसेवा सुरू झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या 24 तासांपासून घरापासून बाहेर असलेल्यांना घरी परतण्याची संधी मिळाली. रेल्वेसोबत विमान सेवाही सुरळीत झाली. काही भागातील रस्ते वाहतूक पूर्ववत झाली. नाशिक, पुण्याच्या दिशेची वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, विक्रोळीत भूस्खलन झाल्याने दोन जण ठार झाले आहेत. तर दोन मजली इमारतकोसळून एक ठार झाला आहे. ठाण्यात मंगळवारी पाच जण पाच जण वाहून गेले आहेत. त्यातील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. घाटकोपरच्या असल्फा विभागात रिलायन्स सबस्टेशनची भिंत घरावर कोसळून रामेश्वर तिवारी (३८) यांचा मृत्यू झाला. तर त्याचा मुलगा कृष्णा तिवारी (९), आणि पत्नी मंजू तिवारी (३२)जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा एकूण ५ वर पोहोचला आहे.

अंधेरी ते चर्चगेट रात्री ११:५८ वाजता पहिली गाडी सुटली. अडकून पडलेल्या प्रवाशांना घरी जाता आले. त्यानंतर सेंट्रल लाईनवरील ठाणे ते कल्याण धीम्यागतीची लोकल सोडण्यात आली. तर कुर्ला ते डोंबिवली ही लोकलही आज सोडण्यात आली. मध्यरात्रीपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर पुन्हा जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते, अनेक नागरिकांच्या गाड्या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. सखलभागातील घरात पाणी शिरल्यामुळे घरातील किमती वस्तुचे नुकसान झाले होते. मुंबईसह उपनगरात रस्त्यावर व रेल्वे मार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन व राज्य शासन, महापलिकेने उपाययोजना करून त्यांची राहण्याची व जेवणांची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या पश्चिम उपनगरात जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक कोंडी पूर्वपदावर आली असून, पश्चिमद्रुतगती मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे.

पश्चिम रेल्वेसेवा पूर्वपदावर आली असून, लोकल सुरळीत सुरू आहेत. चर्चगेट स्टेशन ते विरार दरम्यान लोकल सुरळीत चालू असल्याचे समोर येत आहे.पावसाने झोडपले असतानाच शहरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. तर एका दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. विक्रोळी पार्क साईट येथे वर्षा नगरमध्ये झोपड्यांवर ही दरड कोसळली. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi | ठाण्यात पहायला मिळणार प्रो-गोविंदा स्पर्धेचा थरार, 10 थरांसाठी 21 लाखांच बक्षीस

News Desk

आरपीआय नगराध्यक्षाने केली पोलीस कर्मचा-याला मारहाण

News Desk

राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचे निधन

News Desk